बेधुंद करणार्या पावसात सागरी किनाऱ्यावर तू सोबत असतीस तर!!
तुझ्या रेखीव पावलांची नक्षी पावसाने वाळूतून पुसून टाकली असती!!



तुझ्या स्पर्शाने वाराही बेचैन झाला असता!!
पावसावर स्वतःचा ताबा राहिला नसता!!



तुला भेटण्यासाठी लाटांनी ही  उसळी मारत किनारा जवळ केला असता!!
तुझ्या मनाचे सौंदर्य पाहून शिम्पल्यांनी मोत्यांनाही जन्म दिलाच नसता!!




तू सोबत असती तर पावसालाही जमले नसते तुला भीजवल्या शिवाय थांबणे!!

लाटांनी ही कुरवाळली असती तुला भेटण्यासाठी रेतीची मैदाने!!



केसांना स्पर्श करून वाऱ्यानेही तुला सोबत यायला सांगितले असते!!
तुझ्या पाऊलखुणांचे रेखीव ठसे लाटांनी ही पुसले नस्ते!!



बेधुंद करणार्या पावसात सागरी किनाऱ्यावर तू सोबत असतीस तर!!