वचनांचे हार!!
निकालाचा कागद घेऊन घरी आलं पाखरू!
निकाल बघताच बाबा म्हणतो मोठा झालं लेकरू!
सांग बाळा सांग तुझ्यासाठी काय करू!
महाविद्यालयीन जीवनाचा प्रवास इथूनच तर होतो सुरू!!
महाविद्यालयातील हिरवळ पाहून पोरग गेलं बावरून!
मन केला हरवून तारुण्य आला बहरून!
वर्ग पाहिला दुरून बाई आल्या समोरून!
वर्गात जात मी बसलो होतो सावरून!!
ओळखीपाळखी पडू लागल्या बनू लागले गट!
राजाभोवती सर्व प्यादे आरक्षित करू लागले पट!!
मनाच्या या क्षितीजावरती चमकून गेला तारा!
मंद झाला पाऊस आणि धुंद झाला वारा!!
कारंज्याच्या समोर उभी एक परी राणी!
इथूनच तर सुरू झाली माझी प्रेम कहाणी!
मनाला पडली भूल यवनांची ती चाहूल!
प्रेमाच्या या वाटेवरती टाकलं होतं पहिलं पाऊल!!
हिरवळीवरून चालता चालता पडली तिची नजर!
मनात परत एकदा वाजला प्रेमाचा गजर!
मनमोहक सौंदर्य होते रम्या तिच्या नयनी!
तिला पाहता सर्वच म्हणतात हीच का दादा वहिनी!!
गप्पा गोष्टी करत करत निघून जाई वेळ!
कधी खात पाणीपुरी कधी खात भेळ!!
उनसावली सोबत चालला होता खेळ!
तिच्या सानिध्यात जर जर निघून जाई वेळ!!
वर्गाच्या बाहेरचं वेगळंच होतं विश्व!
प्रियसीला अर्पण केलं माझं मी सर्वस्व!
गुलाबी होती हवा मन होतो स्वच्छंद!
तिच्या सानिध्यात ला काही वेगळाच होता आनंद!
पडला मित्रांचा विसर फुले कारणांचे भंडार!
गुलाबाच्या फुला संगे घातले वचनांचे हार!
गुलाबाच्या फुला संगे घातले वचनांचे हार!!
0 Comments
या ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा