मैत्री वर विश्वास ठेवणाऱ्या सर्व मित्रांच्या मैत्रिणींसाठी आवर्जून लिहिलेली कविता.

'मैत्रीण'


प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!
प्रेयसी नसली तरी प्रिया अशी असावी!!

निरागस मुलासारखी अपेक्षे वीणा रहाणारी!
उमललेल्या फुलासारखी प्रसन्न हसून पाहणारी!
नदीवरच्या पूलासारखी मने जोडत जाणारी!
एक तरी सोबतीन असावी!
प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!!

प्रकाश वाटे मधला प्रकाश ती असावी!
अंधार्‍या रात्री शितल चांदण्यांनी भरलेलं आकाश ती असावी!
दवबिंदुं परी अंतरमनाने सुंदर ती दिसावी!
प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!!


 जीवनातील वळणांवर असलेल्या फलकावरील सूचने सारखी!
 प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असणाऱ्या रचने सारखी!
 प्रेमळ आणि प्रमाणिक प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी रत्नपारखी असावी!
 प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!

पर्वतावरून कोसळणाऱ्या झऱ्या सारखी शुद्ध!
 सरोवराच्या पाण्यासारखी स्वच्छ आणि निखळ!
 अफाट ताकदीने उसळून फेसाळणार्या दर्या सारखी प्रबळ!
 परिस्थिती अनुरुप स्वतःला बदलाव्यात प्रवीण ती असावी!
 प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!!


प्रचंड इच्छाशक्ती असलेली 'महत्वकांक्षा'!
मनाला शांती देणारी 'प्रार्थना'
स्वभावावर राज्य करणारी 'भावना'
आयुष्याच्या वाळवंटात जीवनदायिनी असणारी 'सरिता'
असली कोणी जरी, कविते परिती असावी!
प्रत्येकाला तुझ्यासारखी एक तरी मैत्रीण असावी!!







कृपया वाचकांनी आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया कळवाव्यात
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला उत्तम लेखनासाठी प्रेरणा देत राहतील
वेगवेगळे लेख कविता व मराठी वाचनाची आवड असलेल्या सर्व वाचकांनी जरूर येत राहावं या पेजवर