भाषा

   भाषा ही विचारांची वाहिनी असते, बुद्धीजिविं साठी तर ती जीवनदायिनी असते.
भाषा तोंडाने बोलली जाते असंही नाही, प्रेमाच्या भाषेत डोळेही एकमेकांना सांगून जातात खूप काही. जेव्हा प्रियसी प्रियकराला पाहून खुदकन हसते तेव्हाच कळून चुकते की प्रेमाला कोणतीच भाषा नसते.
     भाषा असते विचारांच्या देवाणघेवाणीसाठी , तिच्या माध्यमातून उत्साहाने बोलतात तरणीताठी, अनुभवाचे बोल याच भाषेतून ऐकवतात ज्यांनी ओलांडली आहे साठी. कोणतीही भाषा छोटी नसते ती फक्त भाषा असते.
      भाषेचा वापर हा माणसाच आयुष्य बदलू शकतो. भाषा जर साखरे सारखी वापरली तर आयुष्याला गोडी येते. मिठासारखे वापरली तर व्यक्तिमत्वाला शोभा देते. भाषेला कधी लाजायचं नसतं कारण भाषाच आपल्याला जगायला शिकवते आपल्याला घडवते मळते आणि समृद्ध हि बनवते. भाषा स्टेटस साठी नसते तर भाषा व्यक्त होण्यासाठी असते आपल्या परकीय भाषेवर प्रभुत्व आहे असं दाखवण्यासाठी त्या भाषेतून अभिवादन करण्यापेक्षा मातृभाषेतूनच नेहमी म्हणावं नमस्ते.
       भाषा आपल्याला नैसर्गिक तेला धरून जगायला शिकवते सामाजिकतेला धरून वागायला शिकवते. भाषेवर आपण भरभरून प्रेम करावं आपल्या शब्द सुमनांनी तिला समृद्ध करावं. लेखन आणि वाचन करण्यासाठी भाषा असते विचार वाढवण्यासाठी. भाषेचे ज्ञान व भाषेच्या माध्यमातून ज्ञान मिळवून आयुष्याचा शब्दकोश वाढवावा.
       भाषा फक्त बोलण्यासाठीच असते का?
तर नाही भाषा असते ऐकण्यासाठी बोलण्यापेक्षा जो जास्त ऐकतो तोच भाषेच्या माध्यमातून सर्वात जास्त शिकतो. भाषा ही अथांग समुद्रासारखी खोल असते, तिची खोली शब्दाचा अर्थ आणि वाक्यामधील आशय यावरून दिसून येते. भावनांच्या प्रवाहाला वाट करून देण्यासाठी भाषा आपल्या मदतीला तत्पर असते, भाषा संत पाण्यासारखी वाहत जाते, जरा सारखे पर्वतावरून कोसळत राहते, लाटेप्रमाणे समुद्रावर उसळत राहते, कोणत्याही रूपात असली तरी ती सर्वांकडे समान दृष्टिकोनाने पाहते.
     भाषेतील लिखाण अलंकृत केल्यास शोभून दिसते, पुरस्कृत केल्यास समृद्ध होते. भाषेकडे अमर्याद शब्दांचा साठा असतो जो मानवाला विचारांना व्यक्त करण्यासाठी वाटा खुल्या  करून देतो. आयुष्य हे कोऱ्या कागदावर सुरू होते आपल्याला हव्या त्या भाषेत हवा तो मजकूर आयुष्याच्या क्षितीजावर आपण लिहू शकतो. भाषेला कोणतेही बंधन नसते कारण भाषा ही प्रत्येकाच्या हृदयातील स्पंदन असते.
     आपल्या भाषेवर प्रेम करून तिला समृद्ध करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आयुष्याच्या कोऱ्या कागदावर भाषेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मजकुर भरा.








हा लेख आपल्याला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळवत राहा.

आणि असे मराठी लिखाण वाचण्यासाठी येत राहा या पेजवर.

हा ललित लेखआपल्याला आवडला असेल तर आपल्या मित्रांना जरूर शेअर करा.

या पेज वरील बाकी पोस्ट वाचण्यासाठी डाव्या बाजूकडील बॅक बटणावर क्लिक करा आणि इतर पोस्ट ही वाचा

Post a Comment

2 Comments

  1. आपल्या बहुमुल्य प्रतिक्रीया आम्हाला आपल्यासाठी चांगल्या गोष्टी लिहिण्यासाठी मदत करतील प्रिय वाचकांनी प्रतिक्रिया जरूर द्याव्यात

    ReplyDelete

या ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा