सर्व वाचक मित्रांना मनपूर्वक नमस्कार!!
सर्व प्रकारचे मराठी लेख कविता वाचण्यासाठी येत राहा, सबस्क्राईब आणि शेअर करा AIR Challenger Tejas या पेजला
मोबाईल आणि इंटरनेट एकविसाव्या शतकातील सामान्य माणसाच्या दृष्टीने सर्वात मोठे शोध. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माणसाला मिळालेले हे वरदान समजले जाते. एका प्रसिद्ध कवितेमध्ये म्हटले आहे!!
प्रमाणामध्ये सर्व काही असावे!!
याच हेतूने आपण ब्लॉग वर
समाज माध्यमांचा अतिवापर आणि तरुणाई.
या विषयांवर लेख वाचत आहोत.
आज बोलू
ऑनलाइन मल्टी प्लेयर गेम्स बद्दल
मोबाईल तुमच्याशी गेम तर खेळत नाही ना?
या लेखात.
मोबाईलचा वापर कशासाठी होतो हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मोबाईल मध्ये एवढी प्रचंड ताकद आहे त्याचा वापर करून आपण कितीही मोठे काम करू शकतो. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, सर्व प्रकारची कामे मोबाईलच्या माध्यमातून केली जातात. मनोरंजन हे त्यामधील एक, म्हणून मनोरंजनासाठी काय काय केले जाते, काय केले जाऊ शकते, हे सांगण्याची आवश्यकता नाही.
नवीन मोबाईल घेताना त्याची RAM आणि अंतर्गत स्मृति पाहिली जाते. गेम खेळण्यासाठी जास्त शक्तिशाली मोबाईल च्या शोधात मोबाईलचे ग्राहक असतात. आजकालच्या काळात ऑनलाइन मल्टी प्लेयर व्हिडिओ गेम खूप प्रसिद्ध आहे. लहानांपासून तरूणांपर्यंत सर्वांनाच हे गेम आकर्षित करतात. 2017 मध्ये सर्व जगात प्रसिद्ध झालेला पब्जी हा देखील त्यापैकी एक गेम आहे. पब्जी चा अर्थ (Play unknown battle ground PUBG) असा होतो. याचा मराठीत अर्थ (अपरिचित लोकांची युद्धभूमी) असा घेतला जाऊ शकतो. या गेममध्ये सैन्याच्या विरोधात लढाई करून आपल्या तुकडीचे संरक्षण करणे हे ध्येय प्रत्येक खेळाडूच्या समोर असते. हा गेम कोणत्याही मित्रासोबत ऑनलाइन खेळला जाऊ शकतो, कारण यामध्ये चार खेळाडू एकत्र खेळण्याची व्यवस्था असते. या गेम सारखे अनेक गेम बाजारात आले जे ऑनलाईन खेळले जाऊ शकतात. निश्चितच हा एक मनोरंजनाचा चांगला मार्ग आहे. प्रमाणामध्ये जर आपण गेम खेळतो तर मन प्रसन्न होते आणि तणाव कमी करण्यासाठीसुद्धा हे एक चांगले माध्यम आहे.
मोबाईल बद्दलचे आकर्षण आणि गेम खेळण्याची आवड या दोन गोष्टी लहानांपासून ते तरुणांमध्ये गेम खेळण्याचे प्रमाण वाढवण्यास कारणीभूत ठरतात. गेम मध्ये निर्माण केलेले आभासी जग हे लहान मुलांच्या कोवळ्या मनावर वास्तवदर्शी प्रभाव पाडते याच कारणाने मुले स्वतःला आभासी जगाचा एक भाग समजतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. एवढेच नाही तर प्रमाणाच्या बाहेर व्हिडिओ गेम खेळणारे तरुण सुद्धा मानसिक रोगांची शिकार बनत आहेत.
अति गेम खेळणे त्याची सातत्याने सवय असणे या गोष्टी तरुणांच्या मनाला देखील ग्रासत आहेत. शाळा, महाविद्यालय, कार्यालय, तसेच कामाच्या ठिकाणी पब्जी सारखा ऑनलाईन मल्टी प्लेयर गेम खेळला जातो. जगात सगळ्यात जास्त भारतात हा गेम खेळणारे खेळाडू आहेत. जगातील काही देशांमध्ये ह्या गेम वर बंदी आलेली आहे, कारण त्या सरकारचे म्हणणे आहे, हा गेम तरुणांचा वेळ खातो आणि त्यांची कार्यक्षमता कमी करतो. हा गेम खेळणारे तरुण दिवसात तीन तासांच्या वर गेम सतत खेळत असतात. याच तीन तासांचा उपयोग करून ते कितीतरी नवीन गोष्टी शिकू शकतात. त्यांची सवय त्यांना असे करू देत नाही. गेम मनोरंजनासाठी खेळला जातो परंतु जिंकण्याची महत्वकांक्षा आणि हरल्याने येणारा तणाव या कारणामुळे तरुण हा गेम खूप गांभीर्याने खेळत असतात.
ब्रेंडन ग्रीन नावाच्या आयरीश व्यक्तीने आपल्या घटस्फोटानंतर तणावाखाली असताना आपली आवड जोपासून तयार केलेला हा गेम आज लाखो तरुण व त्यांच्या आई-वडिलांसाठी तणावाचे कारण बनलेला आहे. हा गेम बाजारात येतात इतका प्रसिद्ध झाला करोडो रुपयांची उलाढाल या गेम्मुळे बाजारात झाली. फेसबुक सारख्या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने या गेम मध्ये गुंतवणूक केली आणि आपल्या वापर करत्यांचा डेटा देऊन या गेमला एक समाज माध्यम बनवले. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून चालू असलेल्या लोक डाऊन च्या काळात भारतात राहणारे कितीतरी लोक मनोरंजनासाठी पब्जी खेळत आहेत. पब्जी पुढे त्यांना कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. हा गेम खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या घरातल्या इतर माणसांनी आवाज देणेसुद्धा त्रासदायक वाटते. त्यांच्या रागाचा भडका सर्व घराला सहन करावा लागतो. या गेमला गांभीर्याने खेळणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर कितीतरी तरुणांनी वास्तविक जगात लोकांची हत्या करून पाहिली आहे. फक्त हे बघण्यासाठी की कि गेम मध्ये हत्या केल्यावर जसा आनंद मिळतो तो वास्तव जगात हत्या केल्यावर मिळतो का? उदाहरणासाठी पाहायचं झालं तर दिल्लीतील तिहेरी हत्याकांड याचा अभ्यास केला जाऊ शकतो. होंग कोंग येथे एका लहान मुलाने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली नंतर याचे कारण असे समोर आले की गेम मध्ये प्लेयर जशी इमारतीवरून उडी मारतात आणि जिवंत राहतात तसेच वास्तविक जगात आपण वाचले जाऊ शकतो का? हे पाहणे त्याचा उद्देश होता. हा गेम आपल्याला मनोरंजनापेक्षा जास्त काहीच देऊ शकत नाही. तरीही या गेमवर हजारो रुपयांचा खर्च करून तरुण खेळत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या मानसिक रोगांपैकी, गेम ऑर्डर डिसीज या रोगाची शिकार प्रमाणाच्या बाहेर व्हिडिओ गेम खेळणारे तरुण होत आहेत. सांगायचे तात्पर्य एवढेच, प्रमाणाबाहेर व्हिडिओ गेम खेळणाऱ्या तरुणांचा त्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारे ताबा नसतो. इराणमधल्या पती-पत्नीची कहाणी काही असेच सांगते, पत्नीने एका दुसर्या खेळाडुला पुनर्जीवित केले असता तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला. बरेच तरुण पब्जी खेळत असल्यामुळे त्यांच्या बायकांना वेळ देऊ शकत नाहीत, रात्रीच्या वेळी जास्त गेम खेळला जात असल्यामुळे युरोपातील काही देशांमध्ये तर घटस्फोटांचे प्रकारही समोर आले. व्हिडिओ गेम खेळणाऱ्या व्यक्तींमधील सामाजिकता आभासी जग नष्ट करत आहे. अशा व्यक्तींना समाजाचा परिवाराचा जिव्हाळा देखील त्रास वाटतो.
हा गेम लहान मुलांच्या हाती लागला त्यापैकी बरीच मुले आभासी प्रभावामुळे हिंसक बनत आहेत. त्यांच्यातील सामाजिक जाणीव नष्ट होत आहेत. आभासी जगाचा प्रभावामुळे वास्तविक जगाला समजण्याचा अभाव निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे.
आयुष्यात कोणत्याही प्रकारची महत्वकांशा, ध्येयं, नसलेले तरूण अशा नवनवीन प्रकारांमुळे भरकटत जाताना पाहायला मिळतात. यामुळे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनही धोक्यात येताना आढळते. लहान मुले आभासी तंत्रज्ञानामुळे रोबोट प्रमाणे वागायला लागतात. यामुळेच काम करणाऱ्या पालकांच्या पालन पोषणाची हार पाहायला मिळते. वास्तविक जगापेक्षा आभासी जगायला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती एखाद्यामध्ये लहानपणापासून विकसित झाली तर, तो व्यक्ती आपल्या मानसिकतेमुळे इतरांना हानिकारक ठरतो.
थोडा विचार करा
काही लोक गेम बनवून करोडो रुपये कमावतात
अब्जाधीश बनतात.
तोच गेम अतिप्रमाणात खेळणारे अब्जाधीश बनण्याची स्वतःमधील क्षमता गमावतात.
भारतासारख्या आदर्श संस्कृती असलेल्या देशात अशी माध्यमे तरुणांची मानसिकता नष्ट करत आहेत. सामाजिक विविधतेने नटलेल्या आपल्या प्रिय देशाची कार्यक्षमता जगाला परिचित आहे. त्याचबरोबर आपल्या तरुणांमधील उत्सुकता, जागृतीची कमी, महत्त्वकांक्षीपणाची कमी, याचा फायदा घेऊन परदेशी लोक समाज माध्यमांच्या रूपात ब्रह्मास्त्र सोडून आपली कार्य क्षमता कमकुवत करताना पाहायला मिळतात. यात सर्वस्वी दोष आपला आहे कारण आपण त्या गोष्टींमध्ये स्वतःला वाहून देतो हे जगाला माहीत असल्यामुळे आपल्या मनाचा ताबा घेणे खूप सोपे आहे हे देखील जगाला समजले आहे. याच कारणामुळे पब्जी, टिक टॉक, यांसारखे प्रकार कार्यक्षम देशांमध्ये बंद झाले असले तरी भारतात प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत.
याचे कारण म्हणजे आपल्यातील संशोधक वृत्तीचा अभाव, अपुरी महत्त्वकांक्षा आणि यशाचा कमकुवत व्याख्या, या गोष्टी आहेत. कोरूना विषाणूचा प्रभावातून देशाच्या अर्थव्यवस्थेला वाचवायचे असेल तर, आपल्याला कार्यक्षमतेची गरज आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे तयार झालेल्या चुकीच्या वापरामुळे) देशातील मनोरुग्णाची संख्या कमी होऊन ते कार्यक्षम बनले तर निश्चितच आपण स्वदेशी ताकतीचा वापर करून अर्थव्यवस्थेला पडलेल्या मंदीच्या वेढ्यातून स्वतःची सुटका करू शकतो.
मोकळ्या वेळात गेम खेळण्यापेक्षा
आर्थिक मंदी आपला गेम करू शकणार नाही याचा विचार केला तर नक्कीच फायदा होईल.
पब्जी च्या भाषेत सांगायचे झाले तर अर्थव्यवस्थेला rewive देण्यासाठी कार्यक्षम लोकांची गरज आहे.
या आर्थिक संकटातून देशाला वाचवण्यासाठी सक्षम बना, कार्यक्षम बना, आर्थिक मंदीच्या वेढ्यातून स्वतःचे व स्वतःच्या परिवाराचे रक्षण करा.
समाज माध्यमं वरून करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, त्या स्वतःला आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवू शकतात समाज माध्यमांचा योग्य वापर हा माणसाला नक्कीच एका उंचीवर नेऊन शकतो.
आपण किंवा आपल्या परिवारातील कोणताही व्यक्ती किती वेळ गेम खेळतो? या सवयीवर आपण नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले आहेत का?
लेखकाचा व्हिडिओ गेम्सला कोणत्याही प्रकारचा विरोध नसून अतिप्रमाणात खेळण्याच्या परिणामांबद्दल सावध करण्यासाठी हा लेख लिहिला गेला आहे.
हा लेख वाचल्यानंतर आपल्या प्रक्रिया करण्यासाठी खाली दिलेल्या प्रतिक्रिया बटणावर क्लिक करून आपल्या प्रतिक्रिया कळवा.
https://airchallengertejas.blogspot.com/2020/04/blog-post_17.html
स्वप्नातील अभूतपूर्व यशाची उंची गाठायची असेल तर मनाला विचारांचे पंख असायला हवेत हे सांगणारी एका चहा ची गोष्ट
@AIR Challenger Tejas
0 Comments
या ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा