एक देश बेजबाबदारपणे कसा वाटतो #COVID 19

सर्व वाचक मित्रांना मनःपूर्वक नमस्कार!!
या ब्लॉगवर सर्व प्रकारचे मराठी साहित्य आपल्यासाठी उपलब्ध असते. हे वाचण्यासाठी या ब्लॉग ला फॉलो करायला विसरू नका.

Read lettest article on COVID 19, corona virus

 एक देश बेजबाबदारपणे वाटतो, जगभरात लाखो आयुष्य संपुष्टात येतात!
 एक देश बेजबाबदारपणे वागतो, रस्ते लॉकडाऊन आणि घरे लॉकअप बनतात!
एक देश बेजबाबदारपणे वागतो, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, मुंबई, ही आर्थिक उलाढाली असणारी शहरे बंद पडतात! 
एक देश बेजबाबदारपणे वागतो, उद्योगांना मोडून टाकतो माणसांना एकमेकांपासून तोडून टाकतो. 
गरिबांचा बळी घेऊन, श्रीमंतांची दातखिळी बसवून, एक देश बेजबाबदारपणे कसा वाटतो?
आर्थिक रक्तवाहिन्या बंद पाडून, स्वतःचा पैसा बाहेर काढून, एक देश बेजबाबदारपणे कसा वाटतो!

    COVID 19 हा विषाणू संपर्कात येणाऱ्या व्यक्तीची शारीरिक हानी करतो. सुरुवातीला ताप, उलटी, जुलाब, अशा प्रकारची लक्षणे दिसतात आणि नंतर गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळतात. हा विषाणू श्वसन संस्थेचे संपूर्ण कार्य बंद पाडून माणसाचा बळी घेतो. याच्या संपर्कात आल्यास त्याची लागण त्वरित होते. सामाजिक संपर्कामुळे याला वाढायला मदत होते. विषाणूच्या संपर्कात आलेल्यापैकी दोन टक्के लोकांचा मृत्यू होतो.  यावर उपचार होणे शक्य असून रोगप्रतिकारशक्ती असलेले व्यक्ती यातून सुटका मिळवू शकतात. 

     17 नोव्हेंबर 2019 सर्व काही ठीक ठाक चाललेल्या  वूहान शहरांमध्ये अचानक एका विषाणूचा संसर्ग होतो. जैविक युद्ध अभ्यासाच्या लॅब मधून मोकाटपणे बाहेर सुटलेला विषाणू जगाला खाण्यासाठी तोंड उघडून फिरायला तयारच होता. त्यासोबतच तयार होते, यापासून उद्योग वाढवण्याच्या संधीच्या शोधात असणारे चिनी व्यावसायिक. स्वतःपासून आग लावली तर स्वतःच नुकसान कमी आणि इतरांचे नुकसान जास्त होतं, कारण जर आग हेतुपूर्वक लावली गेली असेल, तर पाण्याचा हाऊदही जवळच असतो. नोव्हेंबर मध्ये कोरोना विषाणू येतो काय, बाहेर पडून चिनी प्रवाशांमधून जगभरात पसरतो काय, जगातील लाखो लोकांचा बळी घेतो काय, सर्व जगभरात प्रसार झाल्यानंतर चीन पुन्हा सुरळीत होतो. 
     नैसर्गिक रोगांवर उपचार निसर्गात सापडतात पण जैविक हत्यारावर उपचार शोधण्याचा अभ्यास 1945 नंतरच बंद झालेला आहे. सर्व जगाला आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून जगातील काही देशांचा आर्थिक ताबा मिळवण्यासाठी पुढे सरसावणारा चीन सर्वांचेच डोके दुखवत आहे.
     कोणत्याही प्रकारचे सामाजिक स्वातंत्र्य नसलेला देश, हे हत्यार बनवणाऱ्या लॅब मधील डॉक्टरला मारायला कमी करत नाही. एवढच नाही तर या विषाणूबद्दल जगाला माहिती देणाऱ्या सर्वांचाच बळी घेतला गेला. पत्रकारांना बाहेर हाकलून दिले गेले, तोपर्यंत जोवर विषाणूंचा संसर्ग नाहीसा झाल्याचा देखावा उभा राहत नाही. फेब्रुवारी महिन्यात निर्लज्जपणे जगाला हे दाखवत चीन फिरतो की आमच्याकडे चा विषाणू संसर्ग कमी झालेला आहे, आता तुम्ही हा प्रसाद समजून घ्या, कारण याला तर इलाजच नाही.         प्रश्न विचारल्यावर चिनी मातीची थोबडे बंद पडतात, कारण जगाला सावध करण्याची अक्कल आणि आपलं अपयश लपवण्याची शक्कल त्यांच्याकडे नव्हती. जेव्हा विषाणूचा संसर्ग वाढतात त्यांच्याकडे सर्व प्रकारची उपकरणे तयार होती, उपचारासाठी ही आणि जगभरात विकण्यासाठी ही. प्रवासी लोकांमार्फत हा विषाणू भारतात आला आणि आपल्या देशात कधी न घडणाऱ्या गोष्टींची मालिका सुरू झाली. 
     सामाजिक एकता जपणाऱ्या, संस्कृतीने नटलेल्या आपल्या प्रिय देशांत सण-उत्सव थांबले, छोटे उद्योग संपले, वाहतूक व्यवस्था ठप्प झाली, आर्थिक उलाढाली कमी झाल्या, सामाजिक अंतर वाढत गेले, सोशल मीडियावर कोरोनाने चांगला ट्रेंड केला, सुरुवातीला यांची खिल्ली उडवली गेली, नंतर या विषाणूकडून गल्ली गल्ली तूडवली गेली. पोलीस आणि स्वयंसेवकांना उन्हात राहून आपली सेवा द्यावी लागली. डॉक्टर देव झाला आणि सरकार देवदूत.
     जगातील कोणत्याही देशापेक्षा भारत सरकारने या विषाणूला जबरदस्त टक्कर दिली. आपल्या अप्रतिम व्यवस्थेमुळे आणि दूरदृष्टीमुळे गेल्या दीड महिन्यात या विषाणूंचा प्रादुर्भाव कमीत कमी प्रमाणात राखण्यात सरकार जबरदस्त यशस्वी झाले. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर विश्वास ठेवून संपूर्ण राज्य शांततेत आणि व्यवस्थितपणे याचा मुकाबला करत आहे. 
     लाखो मजुरांचे हाल झाले. पैशाची आवक कमी झाल्याने घराघरांमध्ये चिंता पसरली. या काळात सर्वांनाच महात्मा गांधीजींची प्रकर्षाने आठवण आली आणि त्यांनी खेड्याकडे पावले वळवली. सण-उत्सव, श्रद्धा स्थळे, मनोरंजनाची ठिकाणे, सर्व बंद करून शहरे घरात बसले आहेत. प्रशासन चांगल्या प्रकारे सर्वांना धीर देत आहे. 
     परिवाराला चांगल्याप्रकारे वेळ देता येतो, घरातील सर्व गोष्टींचा आढावा घेता येतो, यामुळे कौटुंबिक जीवन समृद्ध बनले आहे. सर्व प्रकारचे प्रदूषण कमी झाले आहे. घरी बसल्या लाखो  लोक वाचनाची आवड जोपासत आहेत. प्रत्येक जण आपापल्या छंदांना वाट करून देताना आणि स्वतःला वेळ देताना पाहायला मिळत आहे. या विषाणूने आपल्याला काही गोष्टी दिल्या जरी असल्या तरी लाखो स्वप्न उध्वस्त केली आहेत.

कोरोना विशालच्या संसर्गाच्या काळात येणारे पुढील लेख वाचण्यासाठी या ब्लॉगवर येत राहा.

सुरक्षित राहून सर्वांची काळजी घ्या प्रशासनाला सहकार्य करा.

Post a Comment

0 Comments