स्वाईप करण्यात वेळ घालवाल तर वेळ तुम्हाला स्वाईप करेल

समाज माध्यमांचा वापर आणि तरुणाई


स्वाईप करण्यात वेळ घालवाल तर वेळ तुम्हाला स्वाईप करेल!!

सर्व वाचक मित्रांना मनपूर्वक नमस्कार!

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा काळात आपण सर्व घरी राहुल
 देशाला सहकार्य करत असाल.
आपल्या आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित रहा आणि वेगवेगळ्या गोष्टींवर लेख वाचण्यासाठी या ब्लॉगवर येत राहा.

     एकविसाव्या शतकात भारत देश प्रगतीच्या वाटेवर आहे. यामध्ये तरुणाईचे मोठे योगदान आहे, भारताने जर तरुणाईची संपूर्ण क्षमता वापरली तर महासत्ता बनण्यासाठी पुढचे दोन दशकं पुरेसे होतील. 
अंशतः तरुण सोडले तर, बाकी सर्व समाजमाध्यमांच्या अति वापरामुळे आपल्या कार्यक्षमतेला व आपल्या ध्येयाला मुकत आहेत. प्रगत देशांमधील लोक असोत किंवा आपल्या देशातील प्रगत लोक असोत हे दोन्ही लोक समाज माध्यमांचा पुरेसा वापर करतात. 
     तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्व जग एका क्लिक वर आले आहे. यातच तरुणांच्या हाती व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, टिक टोक, यांसारखे ॲप्स येत आहेत. 
आपल्या बाकी ब्लॉग मध्ये आपण इतर माध्यमांबद्दल बोलू. 

आज आपण टिक टॉक बद्दल बोलू.


2014 नंतर चीनमधून जगभरात पसरलेल्या टिक टोकचे भारतामध्ये करोडोंच्या संख्येने वापरकर्ते आहेत. हे ॲप कशासाठी वापरले जाते हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. 2014ला जरी हे ॲप विकसित झालं असलं तरी भारतात 2017 नंतर आलेले आहे. या ॲप्सचा इंटरफेस इतका सोपा आहे की यामध्ये आल्यानंतर आपण फक्त वरती आणि खाली स्वाईप करून वेगवेगळे व्हिडिओ बघू शकतो. या ॲपमध्ये सर्व पर्याय हे स्वाईप करून मिळवता येतात. हे एक समाज माध्यम असल्यामुळे येथेही लाईक, फॉलो, यांसारख्या गोष्टींचा पाऊस पाडता येतो. नेटकरी आज या माध्यमातून आपली कला आजमावून भरपूर दाद मिळवताना पाहायला मिळतात. यामध्ये दोन प्रकारचे लोक असतात, 
एक म्हणजे व्हिडिओ बनवणारा.
दुसरा व्हिडिओ पाहणारा.
दोन्ही प्रकारचे लोक टिक टॉकला खूप पसंत करतात, दिवसातला अमुल्य असा वेळ या माध्यमावर खर्च करतात. यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ सहजपणे बनवता येतात तसेच पाहताही येतात.
     टिक टॉक च्या माध्यमातून वेगवेगळे लोक आपली कला समाजासमोर आणताना पाहायला मिळतात. यामध्ये इंटरनेट वर स्वतःचा फोटो टाकायला घाबरणाऱ्या मुलीसुद्धा टिक टॉक वर प्रसिद्धी मिळताना पाहायला मिळतात. आपली समाजव्यवस्था आणि आजची प्रगती पाहता ही गोष्ट नक्कीच स्तुत्य आहे.
काही कलाकारांनी तर टिक टोकच्या जोरावर सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
असे खूप सारे फायदे या माध्यमाने आपल्या तरुणांना मिळवून दिले आहेत.

कोणत्याही माध्यमाचा मर्यादित वापर हात योग्य वापर असतो. टिक टॉक ने आज करोडो भारतीयांचे मन त्याच्या सोप्या इंटरफेस मुळे आणि कमी वेळात बनवल्या जाणाऱ्या व्हिडीओ मुळे काबीज केले आहे. कोणत्याही प्रकारचे काम नसलेले तरुण आज दिवसातील सर्व वेळ टिक टॉक वर घालवतात. आज तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की जर आपण टिकटॉक वापरत आहोत तर त्याचा वापर आपण किती प्रमाणात करतो आणि तो कितपत योग्य आहे. निशितच एकटेपणा घालवण्यासाठी हे एक चांगल्या प्रकारचे माध्यम आहे पण त्याचा अतिवापर हा मेंदू आणि मन यांवर अतिक्रमण केल्याशिवाय राहात नाही. टिक टोक आपल्याला तेच दाखवते जे टिक टोक चा अल्गोरिदम आपल्याला दाखवू इच्छितो. जरी तिथे शोधण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी स्वाईप करण्यामुळे आपण शोधण्याच्या भानगडीत पडायलाच विसरतो.

एका सर्वेनुसार असे सिद्ध झाले आहे की

माणसाची बौद्धिक क्षमता सतत दृकश्राव्य गोष्टी पाहिल्याने कमी कार्यक्षम होते. 
याचा अर्थ असा की जर आपण आपला वेळ सर्व प्रकारे दृकश्राव्य गोष्टी पाहण्यात घालवत असू तर आपल्या मनाची कार्यक्षमता विचार करण्याची शक्ती कमी होत जाते.
कोणत्याही प्रकारचे दृकश्राव्य माध्यम असले तरीही हात प्रभाव पडतो. 

याचा अर्थ खूप वेळ टिक टोक वर घालवणे हे आपल्याला कोणत्या प्रकारच्या त्रासाला बळी पडत आहे, याचा आपण विचार केला पाहिजे.  या गोष्टीचे गंभीर परिणाम आपली कार्यक्षमता विचारशक्ती व स्वभावावर होत असतात..
जर सामाजिक अर्थव्यवस्थेचा विचार केलात तर जेवढा पैसा आपल्या देशातील तरुण कमावतील आणि जेवढा तो आपल्या देशातील माध्यमांवर खर्च होईल तेवढा अर्थव्यवस्थेला फायदा होतो. परदेशी समाज माध्यमांचा अतिवापर आणि त्यातही टिक टॉक सारख्या माध्यमांवर वाया घालवला जाणारा वेळ या गोष्टी कुठे ना कुठे आर्थिक नुकसानाला कारणीभूत ठरतात. यामुळे सर्वस्वी आर्थिक नुकसान जरी होत नसले तरी आर्थिक कार्यक्षमतेचे नुकसान नक्की होते.

आपण टिक टोक चा किती वापर करतात?
आपण टिक टोकचा कशा प्रकारे वापर करता?
आपण ज्या व्यक्तींना आपले आदर्श मानतो, ते खेळाडू असतात, डॉक्टर, राजकारणी असतात, किंवा कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती, टिक टॉक वरती स्वतःचा किती वेळ देतात.
जर ते आपला वेळ या माध्यमावर देत नाहीत, तर आपण एवढा वेळ घालवून त्यांच्यासारखे कसे बनवू शकतो, या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे.
शेवटी तरुणाई ही देशाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती चांगल्या प्रकारे वापरली गेली तर देशाला नक्कीच फायदा होईल.

विचार करा ना!!
कोरोना सारख्या विषाणूचा संसर्गाच्या काळात जर डॉक्टरांनी आपण करतो तेवढा टिक टोकचा वापर केला तर काय होईल?

जर राजकारणी आणि सरकार मधल्या लोकांनी आपल्या एवढाच टिकटॉक चा वापर केला तर आपले काय होईल?

सीमेवरच्या जवानांनी आणि पोलिसांनी जर आपल्या मनोरंजनासाठी आणि एकटेपणा घालवण्यासाठी टिक टॉकचा आपल्या एवढ्यात वापर केला तर काय होईल?

या गोष्टींचा विचार करा आज व्हाट्सअप वर स्टेटस ठेवण्याची आवड असलेले लोक आपला वेळ कशाप्रकारे घालवतात?

एखादा स्टेटस टिक टॉक वर शोधण्यासाठी कमीत कमी एक तास तरी ते लोक वेळ घालवतात. निवडलेल्या स्टेटस डाऊनलोड करून व्हाट्सअप वर ठेवून दिवसभरात किती तरी वेळा तो स्टेटस बघतात. त्या स्टेटसला किती लोकांनी पाहिलं यावर त्यांच्या दिवसाचे यश हे अवलंबून असतं. एवढेच नव्हे तर टिक टॉकवर व्हिडिओ बनवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा दिवस हा त्याला त्या दिवशी आलेल्या लाईक्स आणि वाढलेले फॉलॉवर या गोष्टींवर अवलंबून असतो. टिक टॉक आपल्या वापरकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फायदा देत नाही फक्त लाइक्स आणि फॉलो कमेंट्स या गोष्टींच्या लालसेपोटी आज कितीतरी तरुण वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ वाया घालवतात. वर्च्युअल लाईफ पेक्षा वास्तविक जीवनात आपल्याला किती लोक लाईक करतात आणि किती लोक आपल्याला फॉलो करतात या गोष्टीला जास्त महत्त्व आहे.

आज  टिक टॉकच्या यशा नंतर कितीतरी नवीन माध्यम तयार झाली आहेत जी टिक टॉकला कॉपी करून बनवली गेली आहेत. टिक टॉकचे वापर करते आज या माध्यमांवर आश्रय घेताना पाहायला मिळतात.

सांगायचं एवढच की कोणत्याही माध्यमावर अति वेळ घालवण्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

आपल्या जीवनातील ध्येय त्यावरचे आपले लक्ष अशा माध्यमांमुळे विचलित होऊ देऊ नका.

जर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल आणि या ब्लॉगशी असंबंधित कोणत्याही गोष्टीशी आपण सहमत किंवा असहमत असाल तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. 

अजून कोणत्या विषयावर आपण ब्लॉग वाचण्यात उत्सुक असाल तर तेही आम्हाला नक्की कळवा.

समाज माध्यमांचा अतिवापर आणि तरुणाई या विषयावरील ब्लॉग वाचण्यासाठी येत राहा आपल्या हक्काच्या पेजवर.

तोपर्यंत सर्व घरीच रहा कोरोना विषाणूपासून स्वतःचे आणि सज्जनांचे रक्षण कराल या आशेने सह धन्यवाद.

जय हिंद!! जय महाराष्ट्र!! जय भारत!!

Post a Comment

2 Comments

  1. मस्तचं लिहिलं आहेस रे मित्रा, keep it up.. आणि हा लेख जे कोणी वाचतील त्यांनी वाचून झाल्यावर नक्की स्वतःचं introspection करा काही चूक वाटली तर या काळात नक्की ती सुधारावी

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आपल्या बहुमूल्य प्रतिक्रियांसाठी वेगवेगळ्या विषयांवर ते वाचण्यासाठी येत राहा

      Delete

या ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा